Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

Nilesh Jadhav

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती.

अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले.

या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

९ डिसेंबरला दोघेही लग्न बंधनात अडकले असून लग्नाचे सारे विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

दरम्यान त्यांनी लग्नात उपस्थित राहिलेल्यांना मोबाईलमध्ये कोणत्याही विधींचे फोटो, व्हिडिओ शूट न करण्याचं आवाहन केले होते.

त्यामुळे कॅट आणि विकीच्या हळदीचे फोटो आता त्यांनीच सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.