गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

जितेंद्र झंवर

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. काजल लवकरच आई होणार आहे.

गौतमनंही आपली पत्नी गोड बातमी देणार असल्याचं सोशल मीडियावर फोटो शेअर करून सांगितलं. त्यानंतर काजल अग्रवालने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केलेत.

गौतमने काजलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात दोघांनी रोमॅन्टिक पोझ दिली आहे. फोटोत काजल बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

2022 तुझी वाट पाहत आहे,’असं कॅप्शन गौतमने या फोटोला दिलं आहे. शिवाय सोबत गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केला आहे.

काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. या प्रकरणी तिनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काजलनं 2020मध्ये गौतमशी लग्न केलं. कौटुंबिक आणि जवळचा मित्र असल्यानं दोघांनी लग्न केलं.

गौतमच्या या पोस्टनंतर काजल प्रेग्नंट असल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघांनाही चाहते शुभेच्छा देत आहेत.