Jai Bhim चित्रपटातील 'त्या' सीनवरुन फुटले नव्या वादाला तोंड

Nilesh Jadhav

तमिळ सुपरस्टार सूर्याचा (Surya) 'जम भीम' (Jai Bhim) हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. एकीकडे सिनेमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुरु असताना दुसरीकडे सिनेमातील एका सीनवरुन वाद देखील सुरु झाला आहे.

प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यावर चित्रित केलेला हा सीन आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

या सीनमध्ये अभिनेता प्रकाश राज हे एका व्यक्तीच्या कानाखाली लगावतात. त्यावेळी त्या व्यक्तीकडून मला का मारले, अशी विचारणा केली जाते. यावर प्रकाश राज तू हिंदीत का बोललास? अशी विचारणा करत तमिळ भाषेत बोल म्हणून प्रसज्जड दम देतात. त्यामुळे सिनेमा आता भाषिक वादात अडकला आहे.

हा चित्रपट 1993 च्या सत्य घटनेवर आधारित आहे जिथे न्यायमूर्ती के चंद्रू यांनी अशीच एक केस लढवली होती. यामध्ये सुर्या, प्रकाश राज यांच्यासोबतच राजीशा विजयन, लिजोमोल होसे, राव रमेश आणि के मनिकंदन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि अभिनेते कमल हासन यांनी चित्रपटाचे आणि स्टारकास्ट आणि क्रूचे कौतुक केले आहे. सूयार्चा उत्कृष्ट अभिनय लोकांची मने जिंकत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच चर्चेत आला आहे.'जय भीम' हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे.