Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

Nilesh Jadhav

साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं यश संपादन करणाऱ्या तमन्ना भाटियाचा (Tamanna Bhatia) आज वाढदिवस आहे.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

वयाच्या १५ व्या वर्षी तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी सिनेमातून तिने अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

तमन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला. त्यानंतर तिने आपला मोर्चा तामिळ आणि तेलुगू सिनेमांकडे वळवला. तमन्ना आज साऊथची मोठी स्टार म्हणून ओळखली जाते.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

चित्रपटातील प्रवेशापूर्वी वयाच्या १३ व्या वर्षी अभिजीत सावंत ह्या प्रसिद्ध गायकाच्या संग्रहातून एका गाण्यातून पाहूणी कलाकार म्हणून दिसली आहे

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

मूळची मुंबईकर असलेली तमन्ना एक सिंधी कुटुंबात जन्मली असून संतोष भाटिया आणि रजनी भाटिया ह्या दांपत्याची ती धाकटी मुलगी आहे. तमन्नाचे शिक्षण मुंबैतील जुहू भागातील माणेकजी कूपर शाळेत झाले आहे.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

बाहुबली (Bahubali) या चित्रपटामुळे तमन्ना भाटिया संपूर्ण देशातच नाही तर जगभरात पोहोचली. बाहुबली या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीचा आलेख अधिकच उंचावला.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

सुरुवातीच्या काळात तमन्नाने मॉडेलिंगही केलं आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची ती ब्रँड अम्बॅसेडर बनली.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

तमन्ना फावल्या वेळामध्ये डान्स, पुस्तकांचे वाचन, नेटसर्फिंग, कविता लिहिणे आदींचा तीला छंद आहे. तिला माधुरी दीक्षितचे चित्रपट पाहायला आवडतात.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

‘तमन्ना’ ला सुरुवातीस ना तेलगू भाषा येत होती ना तामिळ. मात्र कालांतराने तिने त्या भाषा शिकून घेतल्या.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)

तमन्नाची सर्वात मोठी इच्छा आहे की, तिला संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटात व हृतिक रोशन बरोबर काम करून राष्ट्रीय पारितोषिक जिंकायचे आहे.

फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया (फेसबुक)