बॉलिवूड अभिनेत्री 'जॅकलिन फर्नांडीस'ला ED चा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त

Nilesh Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. ईडीने जॅकलिन फर्नांडिसची संपत्ती (ED has attached assets of Jacqueline Fernandez) जप्त केली आहे.

ED ने जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar Money Laundering Case) ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ED च्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरनं लोकांकडून जबरदस्तीनं वसुली केलेल्या पैशातून त्यानं जॅकलीनला आतापर्यंत ५.७१ कोटींची महागडी गिफ्ट्स दिली आहेत.

इतकंच नव्हे, तर सुकेशनं जॅकलीनच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नुकतीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील नात्याच्या बातम्या समोर आल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या होत्या.

श्रीमंतांना लक्ष्य करणे, बनावट उच्चपदस्थ अधिकारी बनणे, बॉलीवूड काम नसलेल्या नसलेल्या अभिनेत्रींना भुरळ घालणारा सुकेश सध्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे.