‘वेड’ने लावलं प्रेक्षकांना वेड; सर्वाधिक कमाई करत मोडला 'या' बड्या चित्रपटाचा विक्रम

Aniruddha Joshi

मराठी चित्रपटसृष्टीत रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.

या चित्रपटाने एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराट या मराठी चित्रपटाचा विक्रम मोडत आपले नाव कोरले आहे.

‘वेड’ने एकाच दिवशी ५.७० कोटींची कमाई केली आहे.

याबरोबरच आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटी रुपयांची कमाई करत प्रेक्षकांच्या पसंतीची मोहर उमटवली आहे.