Visual Story : 'धर्मवीर'च्या शिरपेचात मानाचा तुरा

Aniruddha Joshi

मुंबई | Mumbai

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmveer Mukkam Post Thane) या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी साकारली आहे. या चित्रपटाला नुकताच एक चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटद्वारे पुरस्कार स्विकारतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. चित्रपटामधील कौतुकास्पद कामगिरीबाबत त्याला ‘शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान' (Shahir Dada Kondke Smriti Gaurav Sanman) या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद ओक भारावून गेला होता. यावेळी प्रसाद म्हणाला की, मला अत्यंत आनंद होत आहे, धर्मवीरसाठी या वर्षीचा शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करत आहे, असे तो म्हणाला.