हॉलिवूड सुपर स्टार 'ब्रूस विलिस'चा चित्रपट सृष्टीला अलविदा!... धक्कादायक कारण आले समोर

Nilesh Jadhav

आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारे हॉलिवूडचे सुपरस्टार (hollywood superstar) ब्रूस विलिस यांनी (Actor Bruce Willis) चित्रपट सृष्टीला अलविदा केला आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने चाहते निराश झाले आहेत.

चित्रपट सृष्टीत ४० वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर ६७ वर्षीय ब्रूस विलिस (Bruce Willis Retiring) यांनी अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.

ब्रुस विलिस दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याच कारणामुळे त्यांनी चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

ब्रूस यांना अ‍ॅफेसिया(Aphasia) नावाच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करुन ब्रूस यांच्या या आजारपणाविषयी माहिती दिली.

अ‍ॅफेसिया हा मेंदूचा एक आजार आहे, ज्यामध्ये मेंदू संवाद साधण्याची क्षमता गमावतो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या भाषा बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजण्यावर होतो.

अशा लोकांचा मेंदू हा शब्द समजण्यासाठी सक्षम असतो, परंतु मेंदू तो ते शब्द बोलण्यासाठी जिभेला सिग्नल देऊ शकत नाही.

या आजारात माणसाच्या मनात विचार बरोबर येतो, पण अनेक वेळा योग्य शब्द बोलण्यासाठी किंवा मांडण्यासाठी सूचत नाही, ज्यामुळे अशा लोकांना बोलण्यात अडचण येते.

हा आजार तुम्हाला स्ट्रोक किंवा डोक्याला दुखापत झाल्यानंतर होतो. याशिवाय हा आजार ब्रेन ट्यूमरमुळेही होऊ शकतो.

ब्रूस विलिस यांनी १९८० मध्ये आलेली टीव्ही मालिका 'मूनलाइटिंग'मधून अभिनयाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'डाय हार्ड' या प्रसिद्ध फिल्म फ्रँचायझीमध्येही काम केले.

ब्रूस विलिसने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत 'द वर्डिक्ट', 'मूनलाइटिंग', 'द बॉक्सिंग', 'होस्टेज', 'आउट ऑफ डेथ', 'ग्लास' यांसारख्या जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ब्रूस विलिसने त्यांच्या कारकिर्दीत गोल्डन ग्लोब आणि दोन एमी पुरस्कार जिंकले आहेत.