अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला? सत्य आलं समोर...

Nilesh Jadhav

एकेकाळी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. त्यांच्या अफेअरमुळे ते दोघं लाइमलाइटमध्ये होते.

या जोडीचा साखरपुडा झाला होता आणि ते लग्नही होणार होतं. पण असं काही झालं, की कपूर आणि बच्चन कुटुंबाचं नातं अचानक तुटलं. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा मोडला. या गोष्टीला कित्येक वर्ष होऊनही आजही अनेकांच्या मनात हा प्रश्न कायम आहे, की असं काय झालं की त्या दोघांचं लग्न मोडलं.

दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अखेर एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी 2000 मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

एका मुलाखतीवेळी सुनील दर्शन यांची सांगितलं, करिश्मा व अभिषेकचं नातं या अफवा नव्हत्या. ते दोघंही लग्न करणार होते. मी स्वत: दोघांच्या साखरपुड्याला हजर होतो. पण ‘हां मैंने भी प्यार किया’च्या शूटींगवेळी मी वेगळंच काही बघत होतो. करिश्मा व अभिषेक मेड फॉर इच अदर नाहीत, हे मला जाणवलं होतं.

कारण दोघंही सेटवर कायम भांडत असायचे. ते दोघंही एकमेकांसाठी बनलेले नव्हते. ते नेहमी भांडायचे. कदाचित काही माणसं अशीच असतात. हे दोघं खरंच एकमेकांसाठी बनले आहेत का? असा प्रश्न मला त्यांना पाहून पडायचा. अभिषेक गोड मुलगा आहे. करिश्माही चांगली मुलगी आहे. पण कदाचित नियतीने त्यांच्यासाठी वेगळं काही लिहून ठेवलं असावं.

करिश्मा आणि अभिषेक सध्या आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहेत.