रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

जितेंद्र झंवर

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster) लाँच करण्यात आले आहे.

लाँचच्या कार्यक्रमादरम्यानचे दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसले.

रेड कलरच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी रणबीर निळा शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन कलरचे जॅकेट परिधान करून देखणा दिसत होता.

चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करतांना आलियाने रणबीरचा हात धरलेला दिसला तर कधी रणबीर त्याच्या काही बोलण्यावर लाजताना पाहायला मिळाला.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे, तर करण जोहर (Karan Johar) निर्मित हा बिग बजेट चित्रपट आहे. पुढच्या वर्षी ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

रणबीरने आलियाला विचारले, की तिच्या आयुष्यात आर म्हणजे काय? यावर ती आधी लाजते आणि नंतर तशीच प्रतिक्रिया देते.