काँग्रेसने तिकिट दिलेली ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतम कोण आहे?

जितेंद्र झंवर

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं (up assembly election) वारं वाहतंय.

या निवडणुकीत काँग्रेसने हस्तीनापुरातून ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतमला(archana gautam) उमेदवारी दिली आहे.

अर्चना गौतमने IIIMT तून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. पण पत्रकारितेत तिचं मन रमलं नाही.

अर्चनाने मॉडेलिंगला सुरूवात केली. 2014 ला मिस उत्तर प्रदेशचा किताब जिंकला.

अर्चना 2018 मध्ये ती ‘मिस बिकनी इंडिया’ ठरली. ‘मिस बिकनी युनिव्हर्स’चा ताज तिने जिंकला.

अर्चनाची ओळख ‘बिकनी गर्ल’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

अर्चना गौतमने मिस कुओमो इंडिया, मिस टॅलेट हे किताब आपल्या नावे केलेत.

अर्चना काही जाहिरातींमधून छोट्या पडद्यावर झळकली. त्याचसोबत काही दाक्षिणात्य सिनेमातही तिने काम केलं आहे.