'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Nilesh Jadhav

बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) सध्या अंतिम टप्प्यात आलं असून रविवारी आणखी एका स्पर्धकाने या शोला निरोप दिला.

यंदाच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

अभिनेत्री सोनाली पाटीलने देवमाणूस या सीरियलमध्ये काम केलं होतं. बिग बॉस मराठीच्या घरात तिची एंट्री झाल्यामुळे ती घराघरात पोहचली.

बिग बॉसच्या घरात येणारी ती पहिली स्पर्धक होती. शंभर दिवस पूर्ण करूनच जाणार असा निश्चय तिने केला होता.

मात्र आज अखेर व्होट्स कमी पडल्याने बिग बॉसच्या घरातला तिचा प्रवास संपला आहे. भावूक झालेल्या सोनालीने घराबाहेर पडण्यापूर्वी इतर स्पर्धकांची भेट घेतली.

यावेळी सर्वचजण भावूक झाले होते. सोनालीच्या एलिमिनेशनमुळे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांना सुद्धा धक्का बसला.