‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीला बांगलादेशात कार्यक्रमास बंदी; कारण ऐकून थक्क व्हाल

Nilesh Jadhav

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असलेली डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही ही कायम चर्चेत असते.

सोशल मिडियावरचे तीचे बोल्ड फोटोशूट आणि रीयालिटि शोमधले तिचे लूक्स चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतंच नोरा एका अजब कारणामुळं चर्चेत आली आहे.

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे नोराचा डान्स परफॉर्मन्स होणार होता. या कार्यक्रमसाठी नोराने मानधन हे डॉलर्समध्ये मागितले होते. पण अचानक तिचा शो कॅन्सल करण्यात आला आहे.

बांग्लादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी एक नोटिस जारी केली आहे. या नोटिशीमध्ये सांगण्यात आले आहे, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स परफॉर्मन्स रद्द करण्यात आला आहे.

जागतिक स्थिती पाहता आणि परकीय चलन साठा कायम ठेवण्याच्या उद्देशाने नोराचा डान्स परफॉर्मन्स करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

बांगलादेशातील विदेशी मुद्रा भंडार १२ ऑक्टोबर रोजी कमी होऊन ३६.३३ बिलियन डॉलर झाला आहे. एक वर्षापूर्वी तो ४६.१३ बिलियन डॉलर एवढा होता. चार महिन्याच्या आयातील कव्हर करण्यासाठी तो पुरेसा होता.

नोरा फतेही ही मॉरोकन-कॅनेडियन कुटुंबाशी संबंधित आहे. आपलं करियर घडवण्यासाठी तिने भारतात पाऊल ठेवलं.

तिच्या डान्समुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. गेल्या महिन्यात तिचं नाव २०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आलं आहे.