शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

जितेंद्र झंवर

मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्स पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला चार तासांच्या चौकशीअंती अमलीपदार्थ नियंत्रक कक्षानं (NCB) अखेर अटक केली आहे. अन् शाहरुखचे २४ वर्षांपुर्वीचे वक्तव्य व्हायरल आणि सत्यात उतरले.

शाहरुख १९९७ मध्ये सिमी ग्रेवालचा शो मध्ये पत्नी गौरीसोबत सहभागी झाला होता. त्यावेळी मजाकमध्ये जे काही बोलला ते आज सत्य ठरले.

आज शाहरुखचे ते वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

शाहरुख म्हणाला होतो, ‘माझ्या मुलाने मुलींसोबत डेट करावे, सेक्स करावे आणि ड्रग्सचा आनंद घ्यावा. तो बॅड बॉय झाला पाहिजे. गुड बॉय झाला तर मी त्याला घरातून बाहेर काढेल.’

शाहरुख खानने मजाकमध्ये केलेले वक्तव्य सत्य ठरेल, असा विचारही त्याने कधी केला नसेल. परंतु आज आर्यनला अटक झाल्यानंतर ते वक्तव्य सत्य ठरले आहे.