Nilesh Jadhav
अभिनेत्री सनी लियोनीचे मधुबन (Madhuban mein Radhika) हे गाणे नुकतच लॉन्च झाले आहे. परंतु या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
मथुराच्या साधु संतांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली होती. तसेच त्यांची मागणी मान्य न केल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा या संतांनी दिला होता. या गाण्यामुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही संतांनी केला आहे.
तसेच यावर मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सनी लिओनी हिने तीन दिवसांमध्ये वादग्रस्त ‘मधुबन में राधिका नाचे’ हा म्युझिक व्हिडीओ हटवावे, तसेच माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला होता. त्यानंतर आता ट्विटरवर #ArrestSunnyLeone असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
सनी लिओनीनं ज्या "मधुबन में राधिका नाचे" गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं मूळ मोहम्मद रफी यांनी १९६० साली आलेला चित्रपट कोहिनूरसाठी गायलं होतं.
२२ डिसेंबर रोजी सनीचे मधुबन हे गाणे युट्युबवर लॉन्च झाले आहे. हे गाणे कृष्ण आणि राधाच्या प्रेमावर आहे, परंतु सनी ही या गाण्यात अश्लील डान्स करत असल्याचे संतांनी म्हटले आहे.
सारेगमने हे गाणे प्रोड्युस केले असून या गाण्यात सनी आणि शिविका नाचताना दिसत आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरीग्राफी केली आहे. तीन दिवसांपूर्वी रीलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ८० लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.