PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Nilesh Jadhav

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

अंकिता आणि विकी यांनी १४ डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये ती मराठमोळ्या रूपात खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही वेळेपूर्वी आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एकदम पारंपरिक रूपात दिसून येत आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

या फोटोंमध्ये अंकिताने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात हिरवा चूडा भरला आहे. तसेच नाकात नथ आणि केसात गजरा माळून आपला लूक कम्प्लिट केला आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

अंकिताने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे,केली तर मस्करी आहे,मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे,घेतला तर श्वास आहे,रचला तर संसार आहे,निभावले तर जीवन आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

सोबतच अभिनेत्रीने #marathiMulagi हा टॅगसुद्धा दिला आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

या फोटोमध्ये अंकिता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब मराठमोळ्या चालीरिती पार पाडताना दिसून येत आहे.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकमेकांना चार वर्षांपासून डेट करत होते. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे (फेसबुक)