अशी झाली अनन्याची आर्यनशी ओळख

जितेंद्र झंवर

आर्यन खानच्या व्हॅट्सऍप चॅटमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अनन्या पांडेने अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांकडे दोघांची ओळख कशी झाली. त्याबाबत माहिती दिली.

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाची चांगील मैत्रीण आहे.

अनन्या पांडेने एनसीबीला सांगितले की, ती आर्यन खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती.

आर्यन, सुहाना आणि अनन्या चांगले मित्र असण्यामागील कारण आहे दोन्ही कुटुंबामधील कौटुंबिक जवळीक हे ही आहे. शाहरुखने करियरच्या सुरुवातीला फार स्ट्रगल केलं आहे. याच कालावधीमध्ये त्याला चंकी पांडेने मोठा आधार दिला होता.

आर्यन, सुहाना आणि अनन्या अनेकदा पार्ट्या, पिकनिकला एकत्र दिसतात.