Nilesh Jadhav
स्टूडेंट ऑफ द ईयर 2 (Student of The Year 2) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अनन्या पांडे (Ananya Pande) अलिकडे चांगलीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर फोटोज, व्हिडिओज शेअर करुन तिने चांगला चाहतावर्ग निर्माण केला आहे. या चाहत्यांना लेटेस्ट अपडेट्स देत तिने खिळवून ठेवले आहे.
अनन्या हॉट आणि बोल्ड फोटोजची ही सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा हा बिनधास्त अंदाज चाहत्यांनाही भावतो.
अनन्या पांडेने सोशल मीडियावर नुकतेच स्वतःचे काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे.
या नव्या फोटोंमध्ये अनन्या पांडे हिने शॉर्ट स्कर्ट आणि बोल्ड टॉप परिधान केला आहे. घरातील खिडकीसमोर उभं राहून तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.
दरम्यान हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट करुनही अनन्याची नेटवर्थ कोट्यवधींच्या (Ananya Panday Net Worth) घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती ७२ कोटींची मालकीण आहे.
ऐशोआरामात आयुष्य जगणाऱ्या अनन्याची कमाई केवळ सिनेमाच नव्हे तर जाहिरातींच्या माध्यमातूनही होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिची कमाई होते.