VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'

Dr. Pankaj Patil

१९९४ साली झालेल्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत या 21 वर्षीय सुंदरीला एक प्रश्न विचारला गेला. मिस वर्ल्ड होण्यासाठी कोणते गुण असायला हवेत.

या प्रश्नाला उत्तर देताना त्या सुंदरीने उत्तर दिले की, आतापर्यंत आम्ही जितके मिस वर्ल्ड पाहिली आहेत. त्या सर्वांमध्ये क्षमा भाव पाहायला मिळाला. त्यात केवळ मोठ्या लोकांसाठी क्षमा नव्हती तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठीही क्षमा होती. आम्ही असे लोक पाहिले की जे लोक राष्ट्रीयता आणि रंगाच्या पलिकडे पाहू शकतात. आम्हाला त्यांच्या पेक्षाही अधिक पाहण्याची गरज आहे. तरच एक खरी मिस वर्ल्ड उठून दिसेल. एक खरा माणूस म्हणून दिसेल. बस्स हे उत्तर ऐकताच परिक्षकांनी तीची निवड विश्व सुंदरी म्हणून केली.

ती विश्व सुंदरी म्हणजे ऐश्वर्या राय. १९९४ साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ८७ देशांच्या तरुणींनी सहभाग घेतला होता. ऐश्वर्या रायने जजेसच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांचे मन जिंकले होते. ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाली त्यावेळी तिचे वय २१ वर्ष इतके होते. तसेच ती त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती.

ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलू आहे, याशिवाय तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषांचे ज्ञान आहे. ऐश्वर्या रायचे प्रारंभिक शिक्षण (इयत्ता 7 वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाले. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.

मुंबईत त्यांनी आर्य विद्या मंदिर, सांता-क्रूझ आणि नंतर डीजी रुपारेल कॉलेज, माटुंगा येथे शिक्षण घेतले. अभ्यासासोबतच त्याला मॉडेलिंगच्या ऑफर्स येत राहिल्या आणि त्याने मॉडेलिंगही केले.

ती नववीत असताना तिला कॅमलिन कंपनीकडून मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली. यानंतर ती कोक, फुजी आणि पेप्सीच्या जाहिरातींमध्ये दिसली. आणि 1994 मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिची मागणी खूप वाढली आणि तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या

तिला इ.स. १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाची सुरुवात १९९७ मध्ये इरुवर् नावच्या चित्रपटातुन केली.

ऐश्वर्याचा २००७ मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला. २००९ मध्ये तिला पद्मश्री् या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले