PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ 'श्रीवल्ली' पाहिलीत का?

Nilesh Jadhav

प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. करोना विषाणूच्या महामारीनंतर पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला होता. असे असूनही हा चित्रपट हिट ठरला.

या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या लूक आणि स्टाइलने लोकांना वेड लावले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पुष्पाभाऊ अर्थात अल्लू अर्जुनची रियल लाईफ श्रीवल्ली कोण आहे?

अल्लू अर्जुनची त्यांची पत्नी स्नेह ही त्यांची खऱ्या आयुष्यातील श्रीवल्ली आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा दिसायला खूप सुंदर आहे. यासोबतच स्नेहाही खूप ग्लॅमरस आहे.

तिने अमेरिकेत राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. स्नेहाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली असून तिचे वडील हैदराबादचे प्रसिद्ध व्यापारी आहेत.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी एका मित्राच्या लग्नादरम्यान भेटले होते. अल्लू अर्जुनने ६ मार्च २०१६ रोजी हैदराबाद शहरात स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले.

स्नेहा रेड्डी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून स्वत:बद्दल आणि कुटुंबाबद्दल अपडेट करत असते.

या दोघांच्या नात्यातील खास गोष्ट म्हणजे स्नेहा जरी मनोरंजन विश्वातील नसली, तरीही ती अल्लूच्या व्यावसायिक जीवनाला समजून घेते आणि त्याला पाठिंबा देते.