Pushpa The Rise : ‘पुष्पा’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई!

Nilesh Jadhav

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मीका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिकेत असलेला पुष्पा द राईज (Pushpa The Rise) हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे.

हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसावर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुष्पा राज (अल्लू अर्जुन) एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात शेषाचलम हिल्समध्ये लाल चंदनची तस्करी करतो. तस्करीच्या दुनियेत मोठे बनण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि यासाठी तो स्थानिक डॉन मंगलम सीनू (सुनील) याच्याशी सामना करतो.

कालांतराने, तो लाल चंदनाचा निर्विवाद तस्कर बनतो. पण पुष्पाराजला वनाधिकारी शिकावतचा (फहद फासिल) तीव्र विरोध आहे. पुष्पाची प्रसिद्धी कशी झाली आणि तो शिकावतचा कसा सामना करतो, ही पुष्पाची मूळ कथा आहे.