Visual Story : ...म्हणूनच 'बच्चन पांडे' फ्लॉप; अक्षय कुमारची पहिली प्रतिक्रिया

Aniruddha Joshi

अभिनेता अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही....

चित्रपट का फ्लॉप ठरला याबाबत खुद्द अक्षय कुमारनेच स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय नुकतच भोपालमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचला.

या कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चित्रपटामुळे बच्चन पांडे हा चित्रपट फ्लॉप गेल्याचे त्याचे म्हणणे आहे.

अक्षय म्हणाला की, आम्हाला सगळ्यांना आपल्या देशाच्या काही माहित असलेल्या गोष्टी किंवा न माहित असलेल्या गोष्टी सांगायच्या आहेत.

विवेक अग्निहोत्रींनी द काश्मीर फाइल्स बनवून आपल्या देशाचे एक अत्यंत वेदनादायक सत्य सगळ्यांसमोर मांडले आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण सगळे हादरून गेलो आहोत. एवढेच काय माझा बच्चन पांडे चित्रपटदेखील बुडवला. असे अक्षय म्हणाला.

अक्षय कुमार हे स्पष्टीकरण देत होता तेव्हा कार्यक्रमाच्या मंचावर त्याच्यासोबत द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीदेखील उपस्थित होते.