'त्या' जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

Nilesh Jadhav

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारची (Akshay Kumar Vimal Ad) ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीमधून शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अजय देवगनने (Ajay Devgn) अक्षय कुमारचं विमल युनिव्हर्समध्ये स्वागत केलं होतं.

बॉलिवूडमधील तीन स्टार या जाहिरातीसाठी एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहिरात ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यातही अजय देवगन आणि शाहरुख खान तंबाखूच्या जाहिरातीमध्ये आधीही दिसत होते. मात्र अक्षय कुमारने या जाहिरातीत सहभाग घेतल्यावर वादाला तोंड फुटले. (Akshay Kumar apologises to fans after pan masala brand backlash)

याच जाहिरातीवरुन अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. लोकांनी प्रचंड प्रमाणावर अक्षय कुमार याच्यावर टीकेची झोड उडवली. त्यानंतर अक्षय कुमार याने एक महत्त्वाचा निर्णय घेत सोशल मीडियावर चाहत्यांची माफीही मागितली.

अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांची माफी मागत म्हटले की, मी या जाहिरातीमधून स्वत:ला मागे घेतो आहे. त्याने जाहीर केले आहे की, आता तो तंबाकूजन्य पदार्थांच्या उत्पादनाची (विमल ब्रांड) जाहीरात करणार नाही. अशा उत्पादनांचा ब्रँड अँबॅसडर होणार नाही. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमतून अक्षयने हा निर्णय आपल्या चाहत्यांना कळवला आहे

अक्षय कुमारने आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टा पोस्टवर म्हटले आहे की, 'मला माफ करा. माझे हितचिंतक आणि चाहते या सर्वांची मी सर्वांची माफी मागू इच्छितो. पाठिमागील काही दिवसांपासून माझ्याबद्दल आलेल्या प्रतिक्रियांनी मला विचार करण्यास भाग पाडले.

मी कधीही तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन केले नाही. करणार नाही. विमल इलायचीसोबत असलेल्या माझ्या असोसिएशनवरुन काही गोष्टी पुढे आल्या. आपल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे विनम्रतापूर्व मी स्वत:ला या जाहिरातींपासून वेगळे करतो'.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला होता. अल्लू अर्जुनने पैशाचा विचार न करता जनतेच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे प्रचंड कौतुक झाले.