सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

जितेंद्र झंवर

बॉलीवूडमधील सुपरस्टार सलमान खान ५५ वर्षांचा झाला आहे. परंतु अजूनही सलमान खानने लग्न केले नाही.

सलमान खानकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग या संपत्तीचा वारसदार कोण राहणार आहे?

सलमानची कोट्यावधीची संपत्ती कोणाला मिळणार? यासंदर्भात एका मुलाखतीत त्याने खुलाशा केला.

सलमान म्हणाला, मी लग्न केले तर माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा ट्रस्टला जाईल आणि लग्न नाही केले तर संपुर्ण संपत्ती ट्रस्टला जाईल.

पुढे तो म्हणतो, "काही वर्षांपूर्वी मी Being Human foundation या नावाने एका ट्रस्टची स्थापना केली आहे. याच ट्रस्टला माझी संपत्ती जाईल.

सलमान खाने ब्रांद्रामध्ये एक डुप्लेक्स भाड्याने घेतला आहे. मकबा हाईटसमध्ये १७ व १८ व्या मजल्यावर हे डुप्लेक्स असून त्याचे भाडे ८ लाख रुपये आहे.

या डुप्लेक्समध्ये त्यांच्या फर्मसाठी काम करणारा लेखक राहणार आहे. मलिक बाबा सिद्दीकी यांचा हा डुप्लेक्स आहे.