गायक आदित्य नारायणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Nilesh Jadhav

गायक आणि ‘इंडियन आयडॉल’ या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणला (Aditya Narayan) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गोड बातमी दिली. (Aditya Narayan-Shweta Agarwal Blessed With Baby Girl)

आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपला आणि श्वेताचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'मी आणि श्वेता धन्य झालो. आम्हाला हे सांगताना प्रचंड आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे'.

आदित्य हा उदित नारायण यांचा मुलगा असून तो प्रसिद्ध होस्टही आहे. त्यानं इंडियन आयडॉलचे होस्टिंग केले आहे. आदित्य आणि श्वेताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

आदित्यनं गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीतून खास गोष्ट चाहत्यांना शेयर केली होती. (Bollywood Celebrites) त्यामध्ये त्यानं आपल्याला एक छानशी परी हवी असल्याचं सांगितलं होतं. आता आदित्य आणि श्वेतावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.