Nilesh Jadhav
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. भाग्यश्रीला मनोरंजन क्षेत्रातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत रहाते. तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती. भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.
भाग्यश्रीने विश्वगर्जना हे व्यावसायिक नाटक केलं होतं. देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांमुळे ती ओळखली जाते. सिया के राम या मालिकेत तिने शूर्पणखेची भूमिका केली होती.
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा ' शोधू कुठे' हा होता.
भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल या सिनेमांमध्ये काम केलं. चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.