Visual Story : या मायलेकी दिसात सारख्या...!

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

सुंदर अभिनय, उत्तम आवाज अशा भूमिकेत दिसणारी गायकिा, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आर्या आंबेकर (Arya Ambekar).

लिटिल चॅम्प्स (Little Champs), सारेगमप च्या माध्यमातून आर्या प्रकाशझोतात आली.

ती फक्त आवाजामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत राहिली.

लहान वयात कलाविश्वामध्ये पदार्पण करणारी आर्या मराठी कलाविश्वात लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.

आर्याने अनेक मालिका, चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे, यामुळे ती (Social media) सोशल मिडियावर चर्चेत असते.

ती आपल्या चाहत्यांसोबत फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आर्या सौंदर्यामुळेच नाही तर तिच्या आईमुळेही चर्चेत आहे, कारण तिची आईदेखील सुंदर असून या मायलेकी सारख्याच दिसतात.

ती आपल्या आईचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.