Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Dr. Pankaj Patil

१९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.

१९७० च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती.

 1975 साली प्रदर्शित झालेल्या (शोले) चित्रपटात धर्मेंद्र यांनी वीरूच्या भूमिकेत आणि बसंतीच्या भूमिकेत हेमा मालिनी यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.

हेमा आणि धर्मेंद्रची ही जोडी इतकी आवडली की धर्मेंद्रच्या रील लाईफ (ड्रीम गर्ल) हेमामालिनी त्यांची खऱ्या आयुष्यातील ड्रीम गर्ल बनली.

१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. 

अभिनेते धर्मेंद्र  यांनी 8 डिसेंबर २०२२ रोजी आपला 87 वा वाढदिवस साजरा केला.

हेमा मालिनी यांनी पतीच्या वाढदिवशी सकाळी एकत्र सुंदर छायाचित्रे शेअर करत सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली. त्यात लिहीले आहे की,

'प्रिय धरम जी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देते. मी त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. तो सदैव आनंदी राहो, त्याच्या आयुष्यात सदैव आनंद येवो, हीच प्रार्थना. माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत आणि राहतील. माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 8 डिसेंबरच्या संध्याकाळी, ज्यामध्ये ती धर्मेंद्र आणि तिच्या दोन मुली आणि  जावायांसोबत दिसत आहे.

हेमा स्वतःच्या हाताने धरमजींना केक खाऊ घालत आहे

धर्मेंद्र व हेमा दोन्ही मुली आणि जावयांसोबत दिसत आहे आणि खूप आनंदी दिसत आहे. त्याच्या हातात फुलांचा मोठा गुच्छ आहे.