Visual Story : कांबी परिसरात मुसळधार; गावात घुसले पाणी

Nilesh Jadhav

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी परिसरात (Kambi Area) शनिवारी रात्री मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे गावातील नदीला महापूर (Flood) आला असून या पुराचे पाणी गावात घुसल्याने अनेक नागरिक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने उसासहित अनेक पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यानं समोर मोठे संकट उभे राहिले आहे.

गावासह नजीकच्या अनेक वस्त्यांना पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने या वस्त्यांचा संपर्क अडचणीत सापडला आहे. नदीकाठच्या अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा नदीला पूर आला असुन शेतकरी नागरिकांना मोठे नुकसान सहन करण्याची वेळ आल्याचे गावातील जुन्या जाणत्या जेष्ठ नागरिकांतून बोले जात आहे

प्रशासनाने शेतकरी नागरिक व व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसाणीचे पंचनामे करून लोकांना दिलासा देण्याची मागणी सरपंच नितेश पारनेरे व उपसरपंच सुनीलसिंग राजपूत यांनी केली.