Dinesh Sonawane
नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) निमित्ताने मोठ्या संख्येने नाशिककरांनी (Nashik) आज पहाटेपासून शहरातील शिवमंदिरांत गर्दी केलेली दिसून येत आहे. (huge crowd at Shivmandir in nashik)
यामध्ये शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोमेश्वर मंदिर (Someshwar Temple), कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) तब्बल दोन वर्षांनी प्रत्यक्ष पूजा अर्चा करण्याची परवानगी मिळाल्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे....
सकाळपासून हजारो भाविक कपालेश्वराच्या चरणी लिन झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोना सावटामुळे मंदिरे बंद होती, त्यामुळे औचित्य असूनही भाविकांना मंदिरात जाता येत नव्हते.
परंतु, करोनाची तिसरी लाट ओसरली आहे. नाशिक शहरातील मंदिरेदेखील आता उघडली असून नियमित पूजा अर्चा सुरु झाली आहे. भाविकांची मोठी गर्दी आता मंदिरांमध्ये होऊ लागली आहे.
तिकडे सोमेश्वर मंदिरातही (Someshwar Temple) मोठी गर्दी पहाटेपासून झाली आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली.
कपालेश्वराच्या (Kapaleshwar) दर्शनाच्या निमित्ताने गोदातीरीदेखील अनेक भाविकांनी हजेरी लावत आजच्या दिवशी स्नाणाचाही आनंद घेतला. उन्हाच्या लाही लाहीत दुपारी मोठ्या संख्येने भाविकांनी गोदावरीत डुबकी लगावली.