Visual Story : रक्तदानासाठी लागल्या रांगा

Rajendra Patil

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी (Dr. Nanasaheb Dharmadhikari) यांच्या जन्म शताब्दी निमित्त जळगावात प्रतिष्ठानमार्फत...

भव्य रक्तदान शिबीर (Blood donation camp) आयोजीत करण्यात आले होते.

या शिबीरात 219 श्री सदस्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांच्या मार्गदर्शनाने आणि सचिनदादा धर्माधिकारी (Sachindada Dharmadhikari) यांच्या प्रेरणेने शहरातील सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात (Sardar Vallabh Bhai Patel Hall) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी (Mla.Rajumama Bhole) आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut), महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) ,

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे (Vishnu Bhangale), नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील (Dr. Chandrasekhar Patil) उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, नियमांचे पालन करा आणि मनातील भीती दूर करा असे आवाहन करीत प्रतिष्ठानच्या नियोजन बद्ध कार्याचे कौतुक ही केले.

जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवायला नको ही सामाजिक बांधीलकी जोपासत

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता अलिबाग जि रायगड याच्या मार्फत...

जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल सभागृह या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले.

या रक्तदान शिबिरात 219 श्री सदस्यांनी रक्तदान केले. जगावर कोरोना संकट ओढवले आहे त्यामुळे...

सर्वत्र कोरोना महामारी दरम्यान रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे.

अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये यासाठी रेवदंडा येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे आले आहे.

गरजेनुसार पुढील टप्प्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत विविध समाजपयोगी कामे केली आहेत.

त्यामध्ये वृक्षलागवड-संगोपन, स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिक दाखले वाटप...

स्मशानभूमी, दफनभूमीची स्वच्छता, स्मशानभूीचे बांधकाम, विहीर पुनरभरण...

आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम घेवून ते सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.

या रक्तदान शिबिरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसेवक आणि नागरीक स्वयंस्फुर्तीने रक्तदान शिबीरात भाग घेवून रक्तदान करणार केले.