Photo हृदयद्रावक घटना : पत्नीच्या उपचारासाठी पतीची खांद्यावरून पायपीट

जितेंद्र झंवर

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आले नाही.

पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली. परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने सिदलीबाई पाडवी यांनी खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडला.

सिदलीबाई पाडवी या महिलेला पहाटे पाच व तिच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईक तिला उपचारासाठी घेवुन जात असतांना दरड कोसळल्याने रस्ताच नसल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली.

मात्र सिदलीबाई पाडवी यांनी खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडला. या भागात १३२ केव्ही विद्युत लाईट जात असल्याने सदर घाटात ब्लास्टिंग चे काम करण्यात येत आहे.त्यामुळे दरड कोसळत असल्यामुळे रस्ता बंद पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

घाटातील रस्ता बंद झाला आहे. यामुळे गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे.