'बर्नार्ड अरनॉल्ट' कोणता व्यवसाय करतात, ज्याने 'एलन मस्क'ला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले?

Nilesh Jadhav

एलन मस्क (Elon Musk) हे आजघडीला जगभरात चर्चित असलेले महत्त्वाचे नाव. सोबतच ट्विटर या मायक्रोब्लॉगींग प्लॅटफॉर्मचे सीईओ (Twitter) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख.

पण आता जगातील पहिल्या क्रमांकाची सर्वात श्रीमत व्यक्ती अशी एलन मस्क यांची ओळख राहिली नाही. ती जागा बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी घेतली आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) आणि कुटुंब आता पहिल्या स्थानावर आले आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची संपत्ती 186.9 अब्ज डाॅलर आहे.

बर्नार्ड अरनॉल्ट यांना मॉडर्न लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. ते जगातील सर्वात मोठे फॅशन समूह लुई व्हिटॉन मोएट हेनेसी (LVMH) चे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत.

बर्नार्ड अरनॉल्टचा समूह लुई व्हिटॉन हा त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्धी केरिंगपेक्षा मार्केट कॅपच्या बाबतीत जवळजवळ चारपट मोठा आहे.

बर्नार्ड यांचा जन्म एका औद्योगिक कुटुंबात झाला. अभियंता म्हणून त्यांनी व्यावसायिक कारकीर्द सुरू केली.

फेरेट-सॅव्हिनेल कन्स्ट्रक्शन कंपनीत अभियंता म्हणून त्यांनी व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९७८ मध्ये अध्यक्ष बनण्यापूर्वी त्यांना विविध कार्यकारी व्यवस्थापन पदांवर पदोन्नती मिळाली.

अर्नॉल्ट यांनी १९८४ मध्ये लक्झरी वस्तूंच्या बाजारात प्रवेश केला. त्यांनतर एक कापड गट विकत घेतला, ज्यामध्ये ख्रिश्चन डायर देखील होता.

याच्या चार वर्षानंतर त्यांनी कंपनीचे इतर व्यवसाय विकले आणि LVMH मध्ये कंट्रोलिंग हिस्सा विकत घेतला.

अर्नॉल्टच्या कला संग्रहात पिकासो आणि वॉरहोल यांच्या कलाकृतींसह आधुनिक आणि समकालीन चित्रांचा समावेश आहे.