सीरिअल किलर 'चार्ल्स शोभराज' अखेर तुरुंगाबाहेर... त्याची गुन्ह्यांची कुंडली वाचून तुम्ही हैराण व्हाल

Nilesh Jadhav

बिकिनी किलर या नावाने ओळखला जाणारा कुख्यात सीरियल किलर तुरुंगाबाहेर आला आहे. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने चार्ल्स शोभराजला सोडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी हे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आज चार्ल्स शोभराजची सुटका करण्यात आली आहे.

चार्ल्स शोभराज याला वयाच्या आधारावर १९ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्स २००३ पासून नेपाळच्या तुरुंगात बंद होत. आता त्याला १५ दिवसांत त्याला फ्रान्सला पाठवले जाईल.

मूळचा व्हियेतनामचा असलेल्या चार्ल्स शोभराजचा जन्म १९४४ मध्ये व्हियेतनामच्या एका शहरात झाला होता. त्याची आई व्हियेतनामची आणि वडील मूळचे भारतीय होते. चार्ल्सने त्याची काही वर्ष आशिया आणि फ्रान्समध्ये घालवली. शोभराजची आई व्हियेतनाममधील आणि वडील एक सिंधी भारतीय होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार्ल्स शोभराजचं खरं नाव हतचंद भाओनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज असं आहे. त्याला गुन्हेविश्वात बिकिनी किलर म्हणून ओळखलं जातं. १९७० मध्ये चार्ल्सने साधारण २० लोकांची हत्या केली होती. यात जास्तीत जास्त फॉरेन टुरिस्ट महिला होत्या.

शोभराजला मीडिया आणि पोलिसांमध्ये बिकिनी किलर म्हणूनही ओळखले जात होते, कारण त्याचे बळी - सहसा सुट्टीच्या दिवशी बिकीनी घातलेल्या पर्यटक मुली होत्या. तो बिकिनी घातलेल्या मुलींना मारायचा, म्हणून त्याला ‘बिकिनी किलर’ असे टोपणनाव मिळाले.

शोभराजने थायलंड, नेपाळ आणि भारतातील पर्यटकांना, विशेषतः बॅकपॅकर्सना लक्ष्य केले. त्याने अनेकदा त्यांच्याशी मैत्री केली आणि नंतर त्यांना अंमली पदार्थ पाजले, त्यांच्या वस्तू आणि ओळखपत्र चोरले. काही प्रकरणांमध्ये, त्याने ज्यांची हत्या केली त्यांच्या मृतदेहांची त्याने क्रूरपणे विल्हेवाट लावली.

शोभराज खूप हुशार होता. मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यात तो माहीर होता. शोभराज संपूर्ण युरोप आणि आशियामध्ये अनोळखी लोकांना फसवण्यात आणि पोलिसांना चुकवण्यात पटाईत होता. म्हणूनच त्याला सर्प म्हणत.