Aniruddha Joshi
तुम्ही साडीमध्येही चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसता, माझ्या प्रमाणे काही नाही घातलं तरी चांगल्या दिसता, असे वक्तव्य योगगुरु रामदेव बाबा यांनी केले होते.
त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरात नाराजीचे सूर उमटले होते.
महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी महिला आयोगाला पत्र लिहून माफीनामा सादर केला आहे.
आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे त्यांनी राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मी नेहमीच मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. माझ्या एक तासाच्या व्याख्यानात आई हे मातृशक्तीच आहे आणि कपड्यांबद्दल एक शब्द आहे. माझ्या विधानाचा अर्थ साध्या कपडे असा होता.
तरी, माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.