पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रूटी, नेमके काय झाले पाहा फोटोमधून

जितेंद्र झंवर

पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे.

पाऊस आणि खराब वातावरणामुळे रस्ते मार्गाने मोदींनी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता.

पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा राष्ट्रीय स्मारकाच्या ३० किमी अंतरावर होता.

रस्त्यात असणाऱ्या उड्डाणपूलावर नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहचला तेव्हा अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी ताफा रोखला. या उड्डाणपूलावर जवळपास १५-२० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती.