IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनं CSK चं कर्णधारपद सोडलं, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Nilesh Jadhav

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा १५ वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे.

आयपीएलला अवघे दोन दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनीने (MS dohni) चेन्नई सुपर किंग्सचे (Csk captaincy) कर्णधारपद सोडलं आहे. धोनीने चेन्नई संघाच्या कर्णधार पदाची धूरा दुसऱ्या खेळाडूकडे सोपवली आहे.

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यानंतर चेन्नई सुपर किंग्जमधील सर्वात जुणी, अनुभवी आणि विश्वासू असणारा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडे चेन्नई संघाची धूरा सोपावण्यात आली आहे.

३३ वर्षाचा रवींद्र जाडेजा २०१२ मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं २१३ पैकी १३० सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईची विजयाची टक्केवारी ६४.८३ टक्के आहे. ११ वेळा चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि नऊ वेळा फायनलमध्ये पोहोचला.