श्रीलंकेत राजकीय संकट! पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

Nilesh Jadhav

जागतिक स्तरावरमागच्या दोन वर्षात करोनामुळे (COVID19) अनेक देशातील आर्थिक स्थिती हे डबघाईस आली आहे. त्यातीलच एक देश म्हणजे श्रीलंका. सध्या श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (mahinda rajapaksa) यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

महिंदा राजपक्षे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.

याआधी श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आज अखेर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पार्टीच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र, या दबावाविरुद्ध ते समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.