Shraddha Murder Case : "श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर...”, आफताबचा कबुलीजबाब ऐकून हादराल

Nilesh Jadhav

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीमध्ये तिच्याच प्रियकराने हत्या केल्यानंतरचा धक्कादायक घटनाक्रम सध्या चर्चेत आहे.

श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. शनिवारी आफताबला अटक करण्यात आल्यानंतर रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आफताब आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आफताबने श्रद्धाचं शिर फ्रिजमध्ये ठेवलं होतं, तर तिची आठवण आल्यानंतर तो तिचं शिर न्याहाळत असे. तसंच. तिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत असे, असं अफताबने पोलिस चौकशीत उघड केलं आहे.

आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत दिल्लीतील जंगलात फेकले. मात्र, तिचे शिर बरेच दिवस फ्रिजमध्ये ठेवले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याने सर्वात शेवटी श्रद्धाचे शिर जंगलात फेकले.

पोलिस मंगळवारी आफताबला घेऊन दिल्लीच्या जंगलात गेले होते. तिथे बराचवेळ तिच्या शिराचा शोध घेतला जात होता. मात्र, त्यात पोलिसांना अपयश आलं. आजवरच्या तपासात पोलिसांना काही हाडं सापडली आहेत.

या हाडांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पण पोलीस श्रद्धाचं शीर शोधताहेत. आफताबने श्रद्धाचं शिर कुठे टाकलंय याची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करताहेत. श्रद्धाचं शीर सापडल्यानंतर पोलिसांना या तपासात मोठी मदत होणार आहे.

‘मी तिला मारलं’ अशा शब्दात पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली देणारा आफताब पूनावाला पोलिसांना देत असलेली माहिती सारखी बदलतोय. तसंच ही माहिती आठवत नाही नसल्याचंही सांगतोय. यामुळे श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांसमोर अडथळे निर्माण होताहेत.