Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

जितेंद्र झंवर

भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स बनली आहे. 21 वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे.

मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका ललेला मसवाने होती.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्याची संधी मिळाली. ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती.

पंजाबमधील चंदीगड येथील रहिवासी असलेली हरनाज संधू व्यवसायाने मॉडेल आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगड येथून झाले.

तिला घोडेस्वारी, पोहणे, अभिनय, नृत्य आणि प्रवासाची खूप आवड आहे.

हरनाज तिच्या अभ्यासासोबत आणि स्पर्धांच्या तयारीसोबतच अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.

2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड, 2018 मध्ये मिस मॅक्स इमर्जिंग स्टार, 2019 मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब, 2021 मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया किताब तिने पटकवले.