या आयपीएस अधिकाऱ्याने जिंकली जनतेची मने, केले हे काम...

जितेंद्र झंवर

खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.

श्रीनगरमध्ये एसएसपी संदीप चौधरी यांनी एका वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात दिला. या वृद्ध हॉकरने आपल्या अंत्यविधीसाठी एक-एक पैसा जोडून ठेवला होता. मात्र, त्यांची ही आयुष्याची कमाई काही चोरट्यांनी लुटून नेली.

एसएसपी संदीप चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतून या ९० वर्षांच्या व्यक्तीला १ लाख रुपये दिले आहेत. जुन्या श्रीनगरच्या बोहरी कदल भागात रस्त्याच्या कडेला हरभरे विकणाऱ्या अब्दुल रहमान यांना मदत करण्याच्या एसएसपींच्या या निर्णयाचे लोक प्रचंड कौतुक करत आहेत.

संदीप चौधरी सिव्हील सर्व्हीसमध्ये येणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे. सकाळ ८ ते १० वाजेपर्यंत ते मोफत शिकवणी घेतात. त्यांच्या या वर्गात आधी १० मुले होती आता ही संख्या १५० वर गेली आहे.

संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे जेकेपी एसआई (जम्मू-काश्मीर पोलिस परीक्षा)परीक्षेत ३८ मुलांना यश आले आहे.

संदीप चौधरी पंजाबमधील अभनोर येथील आहे. ते १६ वर्षांचे असतांना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. परंतु परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षण पुर्ण केले. पाच वर्ष पोस्ट खात्यात लिपिकाचे काम केले.