आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

जितेंद्र झंवर

नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने (Indian Railway) AC तिकीटाची एक नवीन श्रेणी लॉन्च केली आहे. ‘एसी थ्री इकॉनॉमी क्लास’मुळे स्वस्तात एसी प्रवास करता येणार आहे.

AC पेक्षा हा प्रवास ८ टक्के स्वस्त असणार आहे. या डब्यात ७२ ऐवजी ८३ बर्थ असणार आहे. ६ सप्टेंबर रोजी प्रयागराज ते जयपूर अशी ही रेल्वे धावणार आहे.

या रेल्वेत प्रत्येक बर्थला स्नॅक टेबल ते रिडिंग लाइटची सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांगासाठी या कोचमध्ये विशेष सुविधा आहे. त्यांनी व्हिलचेअर डब्यात आणता येणार आहे. यासाठी दरवाजे मोठे केले आहे.