S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

जितेंद्र झंवर

महाभारतात कर्णजवळ सुरक्षा कवच होते. ते सुरक्षा कवच भेदणे अशक्य होते. आता भारताकडे असेच सुरक्षा कवच आले आहे.

Sergei Malgavko

रशियाकडून भारताने S-400 missile हे सुरक्षा कवच घेतले आहे. त्यामुळे शत्रूची सर्व क्षेपणास्त्र निष्पभ्र ठरणार आहे.

Vitaly Nevar

भारताने S-400 missile हे सुरक्षा कवच पंजाबच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. रशियाकडून भारताला हे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियानिर्मित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही सद्यकाळातील एक आधूनिक व लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशी प्रणाली आहे.

ही एक अत्याधूनिक जहाजभेदी, विमानभेदी व क्षेपणास्त्रभेदी प्रणाली आहे.या प्रणालीत एकाच वेळी ३६वेळा शत्रूच्या विमानांवर मार करण्याची क्षमता आहे.

Sergei Malgavko

४०० हा शब्द म्हणजे ४०० किमी पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असा आहे. यात १२ लॉंचर असतात व यातून एकावेळी ३ क्षेपणास्त्र डागल्या जाऊ शकतात.

१९६७ मध्ये रशियाने आपली एस २०० ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली. याचे नाव अंगारा क्षेपणास्त्र प्रणाली होते व नंतर एस ३०० ही प्रणाली सन १९७८ मध्ये विकसित केली.

एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियाने २००७ मध्ये विकसित केलेली प्रणाली आहे.