Visual Story : अहो आश्चर्यंम! 'या' बड्या नेत्यांनी आजवर भरले अनेक हजारांचे चलन

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सध्या वाहतूक नियम मोडल्यावर थेट ई-चलन किंवा संदेश आपल्या मोबाईलवर धडकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याप्रमाणेच आता मंत्री महोदयांची वाहनांनेदेखील दंडाच्या फेऱ्यात अडकलेली आहेत...

यामध्ये अनेक मंत्र्यांनी आजवर ई-चलन भरले असून त्याची रीतसर पावतीदेखील घेतली आहे. कायद्याचे आणि नियमांचे पालन करावेच लागेल असे ठणकावून सांगणारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही वाहतूक नियम तोडल्यामुळे ५ हजार २०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही एकदा ६०० रुपयांचा दंड भरला होता

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र अद्याप त्यांनी दंड भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे १४ हजार पेक्षा अधिक दंडाची रक्कम बाकी आहे.

यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दंड भरण्यात आघाडीवर आहेत. २७ हजारांच्या दंडाची सर्वाधिक रक्कम त्यांनी भरलेली आहे.