COVID19 : चीन पाठोपाठ 'या' देशात करोनाचा उद्रेक, एकाच दिवसात सव्वासहा लाख रुग्ण

Nilesh Jadhav

जगावरील करोनाचं (world corona cases) संकट कमी होत असल्याचं वाटत असतानाच पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये (China corona update) पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचत आता दक्षिण कोरियामध्येही (South Korea) करोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येतय.

दक्षिण कोरियामध्ये (South Korea corona update) एका दिवसात तब्बल ६ लाख २१ हजार ३२८ नवे रुग्ण सापडलेत. ही आतापर्यंतची एका दिवसातली दक्षिण कोरियातली सर्वात मोठी रुग्णवाढ असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे येथे करोनाचे ४२९ नवीन मृत्यूही (death) नोंदवलेत. ही सुद्धा विक्रमी नोंद असल्याचे समोर येत आहे.

तसेच इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे (New covid variant detected in israel). नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे. या नव्या व्हेरियंटमध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) आवृत्तीचे दोन उप-प्रकार BA.1 आणि BA.2 एकत्र आले आहेत. हा व्हेरियंट जगासाठी अद्यापही अनोळखी असल्याचं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान चीननंतर आता दक्षिण कोरियातही करोनाचा उद्रेक झाल्यानंतर व इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढल्यामुळं जगभरात करोनाची चौथी लाट (fourth wave of the coronairus) येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २ हजार ५३९ नवीन रुग्ण (india New Corona Cases) आढळले असून ६० लोकांचा मृत्यू (India Corona Death) झाला आहे.

तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ४९१ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे. सध्या भारतात ३० हजार ७९९ रुग्णांवर उपचार (Active case) सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.३५ (Daily positivity) टक्क्यांवर आहे.