'डॅडी'बाबत न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय

Aniruddha Joshi

कुख्यात डॉन अरुण गवळीचा लहान मुलाचा (Arun Gowli Son) 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विवाह होणार आहे. यासाठी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता.

अरुण गवळीला (Gangster Arun Gawali) त्याच्या मुलाच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

कारागृह उपमहानिरीक्षक यांनी चार दिवसांचा पॅरोल पोलीस बंदोबस्तात नेण्याची अट घातली होती. कारागृह प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताचा खर्च करावा अशा अटी शर्तीसह अरुण गवळीचा चार दिवसांचा पॅरोल (Parole) मंजूर केला होता.

यासह पाच लाखाची रोख सुरक्षा आणि 5 लाख जमीनदार सादर करण्याची अट घातली होती. मात्र नागपूर खांडपीठाने (Nagpur Court) काही अटी रद्द करत विना बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय दिला आहे.