चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक, अनेक शहरे लॉकडाऊन; भारतातील स्थिती काय?

Nilesh Jadhav

करोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी सरकराने अनेक शहरांत लॉकडाऊन (lockdown) लावला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत तीन कोटी नागरिकांना होम क्वारंटाईन (Home quarantine) करून त्यांना घरात बंद करण्यात आले आहे.

सोमवारी चीनमध्ये करोनाचे (China coronavirus new cases) २ हजार ३०० नवीन रुग्ण आढळले होते. परंतू आज मंगळवारी ही रुग्णसंख्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. आज ५ हजार २८० नवे करोना रुग्ण सापडले आहेत. (China corona update)

चीनमधील जिलिन शहरात यापूर्वी लॉकडाऊन (lockdown in China) लावण्यात आला होता. तर शेजारील राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिलिनला लागून असलेल्या यांजीची सीमा उत्तर कोरियाला लागून आहे. या ठिकाणी एकूण सात लाख नागरिक राहतात. त्यामुळे येथे अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

चीनमध्ये जवळपास १० शहरे आणि काऊंटीमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये चीनचा टेक हब असलेल्या शेंझेन शहराचा देखील समावेश आहे. यामुळे तेथील सुमारे १७ दशलक्ष लोकांना घरात रहावे लागले आहे.

दरम्यान भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २ हजार ५६८ नवीन रुग्ण (india New Corona Cases) आढळले असून ९७ लोकांचा मृत्यू (India Corona Death) झाला आहे.

तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ७२२ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे. सध्या भारतात ३३ हजार ९१७ रुग्णांवर उपचार (Active case) सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.३७ (Daily positivity) टक्क्यांवर आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता आशिया खंडात पुन्हा करोनाचा उद्रेक दिसून येत आहे. खबरदारी न घेतल्यास जगभरात करोनाचा उद्रेक होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच करोनाची नवी लाट पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने तसेच इतरही शास्त्रज्ञांनी दिला आहे.