सर्वात लांब चंद्रग्रहण पाहा फोटोंमधून

जितेंद्र झंवर

गेल्या ५८० वर्षांमधील सर्वात दीर्घकाळ चालणारे चंद्रग्रहणला आज दुपारी १२.४८ वाजता प्रारंभ झाला. हे ग्रहण तब्बल ३ तास आणि २८ मिनिटे दिसणार आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी कार्तिक पौर्णिमा आणि खंडग्रास चंद्रग्रहण आहे.

दीर्घ चंद्रग्रहण १८ फेब्रुवारी १४४० रोजी दिसलेले होते. सामान्यतः इतके दीर्घकाळ दिसणारे ग्रहण ही हजार वर्षातून एकदाच दिसणारी घटना आहे.

भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही भागांमधून ही दुर्मिळ घटना दिसली.

ग्रहण ही एक वैज्ञानिक आणि खगोलीय घटना आहे. अनिष्ट परिणाम किंवा संकटे यांच्याशी याचा काहीही संबंध नाही.