Children’s Day special : मुलांना दाखवा 'हे' अनोखे चित्रपट

जितेंद्र झंवर

लहान मुलांचा चित्रपटातील सहभाग सुरुवातीपासूनचा आहे. त्यांना त्या चित्रपटातून काही शिकण्यासारखे ते मुलांचे चित्रपट पहिलेच जातात. लहान मुलांचे निरागस भावविश्व व भवतालचे रखरखीत वास्तव यातून निर्माण झालेला संघर्ष, हा अनेक जागतिक चित्रपटातील कथांचा केंद्रबिंदू आहे. आज बालदिनानिमित्त मुलांवर असलेल्या चित्रपटांची महिती पाहू या...

आय एम कलाम

एका छोट्‍या मुलाची प्रेरणादायी कथा या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. परिस्थितीमुळे त्‍या लहान मुलाची स्‍वप्ने, कशी नाहीशी होतात. परंतु, स्वप्नांना बळ देऊन ते पूर्णत्‍वाकडे नेण्‍यासाठी जिद्‍दीने काम करण्‍याची त्‍या लहानग्‍याची साहसी कहाणी चित्रपटात पाहायला मिळते. हर्ष मायर या बाल कलाकाराने एका राजस्‍थानी मुलाची भूमिका केली होती.

चिल्लर पार्टी

या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालाने केली होती. तर सलमान खान सहनिर्माता होता. या चित्रपटात एका सोसायटीमधील लहान मुले एका कुत्र्याची काळजी कशाप्रकारे घेतात, हे दाखवण्यात आले आहे. एक मुलगा सोसायटीतील गाड्‍यांची साफसफाई करण्‍याचे काम करतो. हे काम करत असताना त्‍याचे सोसायटीतील इतर मुले मित्र होतात.

स्टॅनली का डब्बा

अमोल गुप्‍ते दिग्‍दर्शित या चित्रपटाची कथा अत्‍यंत भावूक अशी आहे. ही कहाणी आहे स्टॅनली नावाच्‍या मुलाची. स्टॅनली शाळेतला हुशार विद्‍यार्थी असतो. त्‍याला शाळेतले शिक्षक प्रेम करत असतात. विशैश म्‍हणजे, स्‍टॅनलीच्‍या जेवणाचा डब्‍बा या मुद्द्‍यावर हा चित्रपट आधारलेला आहे.

तारे जमीन पर

आमिर खान, दर्शील सफारी, तान्या छेडा, सचेत इंजीनियर, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा स्‍टारर ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आपल्‍या मुलांसोबत पालकांनी नक्‍की पाहायला हवा. आमिर खानच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला हा पहिला चित्रपट होता. एका मुलाला केंद्रस्‍थानी ठेवून हा चित्रपट बनवण्‍यात आला होता.