आयटीआय
)आयटीआय
नाशिक

आयटीआय उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

ByGokul Pawar

नाशिक | Nashik

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी...

तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, नाशिक यांचे संयुक्त विद्यामाने ऑनलाईन पध्दतीने दिनांक १ ते 15 आक्टोबर 2020 दरम्यान “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यात जास्तीत-जास्त रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा लि. नाशिक यांचेसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, एसएससी आणि आयटीआय-एनसीव्हीटी उत्तीर्ण पात्रताधारक आणि अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.

वेल्डर, फीटर, मोटर मॅकेनिक, डिझेल मॅकेनिक, इलेक्ट्रीशियन, टुल अँड डाई मेकर, टुल अँड डाई मेकर (प्रेस टुल्स, जॅग्स अँड फीक्चरेस), शिट मेकर वर्कर, वायरमन, ड्रॉफ्टसमन (मॅकेनिकल), ड्रॉफ्टसमन (इलेक्ट्रीशियन), इलेक्ट़ॉनिक मॅकेनिक, ट्रेक्टर मॅकेनिक, पेंटर जनरल अशा एकूण -14 ट्रेडसाठी 405 रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Nashik Online JF-7 (2020-21) यामध्ये ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत.

यासाठी सदर वेबपोर्टलवर रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या पात्र उमेदवारांच्या मोबाईल दुरध्वनीव्दारे (Skype, Whatsapp, etc.) मुलाखती घेण्यात येणार आहेत.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त आयटीआय उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रते नुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी 0253-2972121 आणि ई-मेल nashikrojgar@gmail.com या वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक आणि शैलेंद्र नलावडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.